Tuesday, January 3, 2012

Bappa Aani Mee

I wrote this in September 2009. Wanted to write three more stanzas, but never got to finishing it. तेंव्हा माझं ही पोट धष्ट-पुष्ट होतं, तिथेच काय ती प्रेरणा मिळाली. आता पोट सपाट झालंय आणि पुन्हा फुगावं अशी इच्छा नाही, त्या मुळे उरलेली कविता सुचेनाशी झाली :P


बाप्पा आणि मी


आरशात बघत होतो, बाप्पा, मी मला,
ऋतं वच्मि सत्यं वच्मि, सांगतो तुला,
तसा खूप मोठा रे तू, आम्ही कोण काही,
तरी सुद्धा कसा मयि तुझा गुण आला ?


पोट माझे सुटलेले फुग्यापरि गोल
माठा एका दोन कान असा काही डौल
कानावर उपदेशांचे तेच तेच बोल
व्यायामाचा आभ्यास मी करावा सखोल
मुर्तीमंता तुझे पोट माझ्यावानीच आहे,
तुझे नाव लंबोदर, पण माझे ढोल्या ढोल ?